पाॅर्न दाखवत विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा अत्याचार; शिक्षिकेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:21 IST2024-12-30T14:20:39+5:302024-12-30T14:21:18+5:30
शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगा एका शाळेत दहावीत आहे.

पाॅर्न दाखवत विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा अत्याचार; शिक्षिकेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पुणे : दहावीतील विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षिकेनेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाेक्सो अंतर्गत २७ वर्षीय शिक्षिकेविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिक्षिकेला अटक केली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगा एका शाळेत दहावीत आहे. शुक्रवारी (दि.२७) तो शाळेत दहावीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर अत्याचार केले. शाळेच्या आवारातच शिक्षिकेने मुलावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सीसीटीव्हीत तपासले
- मुख्याध्यापिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर याविषयी संबंधित शिक्षिकेकडे आणि विद्यार्थ्याकडे वेगवेगळी चौकशी केली.
- संबंधित शिक्षिका आणि विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली. या मुलाच्या घरीही एकदा ही शिक्षिका गेलेली होती.