दिवाळी खरेदीदरम्यान महिला डॉक्टरचा टेलरने केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:42 IST2018-10-29T16:21:37+5:302018-10-29T16:42:39+5:30
या घटनेनंतर महिला डॉक्टरने पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिवाळी खरेदीदरम्यान महिला डॉक्टरचा टेलरने केला विनयभंग
मुंबई - दिवाळीची खरेदी करताना घेतलेल्या कुर्त्याच्या अल्टरेशनवेळी महिला डॉक्टरचे माप घेताना अश्लील स्पर्श केल्याप्रकरणी 44 वर्षीय टेलरला खार पोलिसांनी अटक केली आहे. हाफिज लाडले सब शेख (वय ४४) असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालााने हाफिजला पोलिस कोठ़डी सुनावली आहे.
खार येथील लिंकिंग रोडवर असलेल्या एका शोरूममध्ये पीडित डॉक्टर महिला दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आली होती. कपडयाची खरेदी करताना एक कुर्ता पीडित डॉक्टर महिलेला तोकडा पडत होता. त्यामुळे तो कुर्ता अल्टर करण्यासाठी सांगितला. त्यावेळी हाफिज हा महिला डॉक्टरचं माप घेण्यासाठी आला. माप घेत असताना हाफिजने महिला डॉक्टरला चुकीचा स्पर्श करण्यास सुरूवात केली. महिलेने त्याला बजावून देखील पुन्हा हाफिज त्याच पद्धतीने स्पर्श करू लागला. या घटनेनंतर महिला डॉक्टरने शोरूमच्या मॅनेजरला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरने १०० डायल करत पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.