बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:56 IST2022-11-14T19:31:03+5:302022-11-14T19:56:38+5:30

प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. मात्र, त्याची बायको काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली.

Taunted by his father for leaving his wife; The son killed the father in ambernath | बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या

बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या

पंकज पाटील

अंबरनाथ : बायको सोडून गेल्यानंतर टोमणे मारणाऱ्या बापाची मुलाने हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथ शहरात घडला आहे. बापाकडून मारले जाणारे टोमणे आणि मानसिक त्रास याला वैतागून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अंबरनाथच्या दत्तकुटीर भागात देविदास किसन सूर्यवंशी (६०) हे परिवारासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा प्रकाश सूर्यवंशी हा रिक्षा चालवण्याचे काम करतो. मात्र, बायको सोडून गेल्याने वडिल त्याला टोमणे मारत होते. त्यावरुनच हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. मात्र, त्याची बायको काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली. याच कारणावरून देविदास हे त्यांचा मुलगा प्रकाश याला सतत टोमणे मारत, सतत घालून पाडून बोलत होते. बापाकडून होणारा हा मानसिक त्रास प्रकाशला असह्य होत होता. त्यातच रविवारी रात्री प्रकाश हा घरी आल्यानंतर जेवायला बसला होता. यावेळी पुन्हा एकदा देविदास यांनी त्याला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने लाकडी फळीने देविदास सूर्यवंशी यांना मारहाण केली. या मारहाणीत देविदास सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत देविदास सूर्यवंशी यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर काही वेळाने प्रकाश याला सुद्धा अंबरनाथ शहरातूनच ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Taunted by his father for leaving his wife; The son killed the father in ambernath