तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:54 IST2025-03-20T10:53:57+5:302025-03-20T10:54:14+5:30

पोलीस जेव्हा या घरात शिरले तेव्हा त्यांना भिंती दिसल्या ज्या काही रहस्य लपवत होत्या. भिंती पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

tantric symbols bholenath photo english sentences in sahil house saurabh meerut muskan | तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य

तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य

मेरठच्या सौरभची हत्या ही एक सामान्य घटना नव्हती तर एक क्रूर हत्या होती. ज्यामध्ये प्रेम, फसवणूक, तंत्र-मंत्र आणि काळी जादू यांचं भयानक मिश्रण होतं. सौरभ, एक साधा तरुण होता, ज्याने कधीही कल्पना केली नसेल की त्याची पत्नीच त्याचा काटा काढेल. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे साहिलचं घर. ज्याच्या भिंती सामान्य नाहीत. भिंतींवर विचित्र गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. काळ्या जादूमध्ये अडकलेल्या,भयंकर, धोकादायक माणसाची मनोवृत्ती यातून दिसून येत आहेत. 

पोलीस जेव्हा या घरात शिरले तेव्हा त्यांना भिंती दिसल्या ज्या काही रहस्य लपवत होत्या. भिंती पाहून त्यांना मोठा धक्का बसला. भगवान भोलेनाथांचा फोटो, लाल आणि काळ्या रंगात कोरलेली रहस्यमय तांत्रिक चिन्हं आणि इंग्रजीत लिहिलेली काही विचित्र वाक्यं... असं वाटत होतं की, ही खोली कोणत्याही सामान्य माणसाची नाही, तर एका मनोरुग्णाची आहे. पोलिसांना असं वाटतं की साहिल अंधश्रद्धा आणि काळ्या जादूच्या आहारी गेला आहे. पोलीस आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, सौरभची हत्या करण्यामागचा नेमका हेतू काय होता. 

मेरठ पोलिसांनी साहिल आणि मुस्कान यांना सीजेएम न्यायालयात हजर केलं. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन बाहेर येताच तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच संतप्त वकिलांनी दोन्ही आरोपींवर हल्ला केला. वकिलांनी साहिलला बेदम मारहाण केली आणि त्याचा कुर्ताही फाडला. परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली की आरोपींना गर्दीपासून वाचवण्यासाठी आणि न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. नंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जीपमध्ये नेलं.

"आमची मुलगीच वाईट, तिला जगण्याचा अधिकार नाही, फाशी द्या"; आई-वडिलांचा मोठा खुलासा

मेरठमध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली, त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली आहे. आता या प्रकरणात मुस्कानच्या आईने आपली मुलीला चुकीचं वागत असल्याचं म्हटलं आहे. मेरठमध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली, त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली आहे. आता या प्रकरणात मुस्कानच्या आईने आपली मुलीला चुकीचं वागत असल्याचं म्हटलं आहे.
 

Web Title: tantric symbols bholenath photo english sentences in sahil house saurabh meerut muskan