ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:52 IST2025-07-21T14:49:12+5:302025-07-21T14:52:33+5:30
महिलेला तिच्या पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पण पतीमुळे अडचण निर्माण झाली होती.

फोटो - tv9hindi
तामिळनाडूमधून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीला विष देऊन त्याची हत्या केली. महिलेला तिच्या पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पण पतीमुळे अडचण निर्माण झाली होती. म्हणून पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील अरुर येथील कीराईपट्टी गावात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अम्मुबी असं आरोपी पत्नीचं नाव असून तिच्या पतीचं नाव रसूल होतं. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.रसूलने काही वर्षांपूर्वी अम्मुबीशी लग्न केले. रसूल आणि अम्मुबीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रसूल एका खासगी कंपनीत ड्रायव्हर होता.अम्मुबी घरी राहून मुलांची काळजी घेत असे. त्यांचं सर्व उत्तम सुरू होतं. मात्र अचानक असं काही घडलं की आयुष्यच उद्ध्वस्त झालं.
अम्मुबीच्या आयुष्यात लोकेश्वरनची एन्ट्री झाली, ज्याच्याशी तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. पती नात्यात अडथळा ठरत असल्याने या दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला. काही दिवसांपूर्वी रसूलला उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. यादरम्यान, त्याच्या रक्ताचे नमुने तपासले असता, त्यात कीटकनाशकांचे अवशेष आढळले.
पोलिसांना संशय आला, त्यांनी अम्मुबीची चौकशी केली. तिने तेव्हा काही विचित्र गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅट तपासलं आणि संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. लोकेश्वरनच्या सांगण्यावरून अम्मुबीने रसूलला विष दिलं. तिने सर्वात आधी डाळिंबाच्या ज्यूसमध्ये विष मिसळले, परंतु रसूल ते प्यायला नाही. यानंतर तिने सांबारमध्ये विष मिसळलं, जे खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.