भयंकर! जन्मदात्या आईनेच 20 हजारांत विकलं नवजात बाळ; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:10 IST2022-05-12T18:02:31+5:302022-05-12T18:10:02+5:30
Crime News : एका 29 वर्षीय महिलेने आपल्या नवजात बाळाला 20 हजारांत विकलं आहे.

भयंकर! जन्मदात्या आईनेच 20 हजारांत विकलं नवजात बाळ; कारण ऐकून बसेल धक्का
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलाला 20 हजारांत विकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूर पंचायतमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने आपल्या नवजात बाळाला 20 हजारांत विकलं आहे. महिलेने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने असं केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चंद्रा नावाच्या महिलेला अटक केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्य़ात पेरम्बक्कमच्या सरकारी रुग्णालयात चंद्राने एका मुलाला जन्म दिला. याआधी चंद्राला दोन मुलं आहेत. त्यामुळे चंद्रा गर्भवती असताना तिच्यासोबत काम करणाऱ्या जयंती नावाच्या एका महिलेने आपल्या भावासाठी हे बाळ खरेदी करण्याची इच्छा सांगितली. तसेच मुलाच्या बदल्यात 20 हजार रुपये देखील देईन असं सांगितलं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिसरा मुलाचा सांभाळ कसा करायचा ही चिंता असल्याने सौदा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलाचा जन्म झाला. तेव्हा आधी दिलेल्या आश्वासनानुसार नवजात बाळाला जयंतीकडे सोपवलं. ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी चंद्राला मुलाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ती वेगवेगळ्या गोष्टी रचून सांगू लागली. पोलिसांनी याबाबत चंद्राची चौकशी केली तेव्हा तिने सुरुवातीला काहीच सांगितलं नाही पण नंतर मात्र सर्व कबूल केलं. परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने असं पाऊल उचललं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.