आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:45 IST2025-10-12T12:43:31+5:302025-10-12T12:45:12+5:30
तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरला आणि नंतर पोलिसांसमोर सरेंडर केलं.

फोटो - आजतक
तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरला आणि नंतर पोलिसांसमोर सरेंडर केलं. पट्टुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावात ही घटना घडली. आरोपी विनोथ कुमारची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती. याच रागातून टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीसार, आरोपी विनोथ कुमारचे नित्याशी लग्न झालं होतं. ११ वर्षांची ओविया, ८ वर्षांची कीर्ती आणि ५ वर्षांचा ईश्वर अशी तीन मुलं होती. हे कपल गेल्या सहा महिन्यांपासून वेगळं राहत होतं. नित्या तिच्या माहेरी राहत होती, तर मुलं मधुकुर गावात विनोथसोबत राहत होती.
काही दिवसांपूर्वी, विनोथने नित्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी परत येण्यास सांगितलं, परंतु तिने नकार दिला. यामुळे दुःखी होऊन, विनोथने शुक्रवारी त्याच्या मुलांसाठी मिठाई आणली, त्यांना खायला दिलं आणि नंतर त्यांचा गळा चिरून तिघांचीही हत्या केली.
गुन्हा केल्यानंतर विनोथ स्वतःला पोलिसांसमोर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत आणि हत्येमागील कारणांचा तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की विनोथ मानसिकदृष्ट्या तणावात होता आणि वैवाहिक वादामुळे तो खूप त्रस्त होता.
या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, विनोथ त्याच्या मुलांवर खूप प्रेम करत होता आणि त्याचं हे कृत्य सर्वांसाठी धक्कादायक आहे. आरोपीने हा प्लॅन आधीच केला होता की रागाच्या भरात हा गुन्हा केला होता याचाही पोलीस आता तपास करत आहेत.