पतीला सोबत घेत तिने प्रियकराची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 08:15 IST2022-11-21T08:14:40+5:302022-11-21T08:15:19+5:30

विकास चौधरी असे मृताचे नाव आहे. चौधरीच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Taking her husband with her, she killed her lover | पतीला सोबत घेत तिने प्रियकराची केली हत्या

पतीला सोबत घेत तिने प्रियकराची केली हत्या

एस.पी. सिन्हा -

पाटणा : पतीला सोबत घेत एका महिलेने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यात घडली. क्रूरपणाचा कळस म्हणजे, मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावली. 

विकास चौधरी असे मृताचे नाव आहे. चौधरीच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय झाले?
विकास हा प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता. त्या महिलेच्या पतीला ही बाब समजली. त्यानंतर या दाम्पत्याने विकासची हत्या केली. विकास आणि त्या महिलेचे खूप वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या महिलेच्या माहेरच्या गावात राहून विकास हा दहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यानंतर या दोघांचाही विवाह झाला. तरीही या दोघांच्या भेटी सुरूच होत्या. 
 

 

Web Title: Taking her husband with her, she killed her lover