"हे २० रूपये घे अन् तोंड बंद ठेव..."; प्रिसिंपलने दुसरीतील मुलीचं केलं लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:56 IST2025-02-21T11:56:00+5:302025-02-21T11:56:39+5:30
शाळेतील प्रिसिंपल खूप चुकीचे काम करतो, त्याचा स्वभाव आधीपासूनच खराब आहे असं गावकऱ्यांनी आरोप केला.

"हे २० रूपये घे अन् तोंड बंद ठेव..."; प्रिसिंपलने दुसरीतील मुलीचं केलं लैंगिक शोषण
जमुई - बिहारच्या जमुई इथं एका सरकारी शाळेत लाजिरवाणी बाब समोर आली आहे. याठिकाणी शाळेच्या प्रिसिंपलने दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत आक्षेपार्ह कृत्य केले आहे. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक शमशेर आलमवर दुसरीतील विद्यार्थिनीवर २० रुपये आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. "हे घे २० रूपये, तुझं तोंड बंद ठेव, पैसे आले तर तुला सर्वात आधी मिळतील" असं आरोपीने म्हटल्याचं मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितले.
या घटनेनं मुलीला धक्का बसला असून भीतीपोटी तिने शाळेत जाणं बंद केले. मुलीच्या आई वडिलांनी जेव्हा तिला शाळेत न जाण्याचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती ढसाढसा रडत होती. त्यानंतर तिने आईला शाळेतील प्रिसिंपलने केलेले कृत्य सांगितले. ही घटना कळताच शाळा परिसरात गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली आणि त्यांनी शाळेतील प्रिसिंपलविरोधात तीव्र निदर्शने केली. इतकेच नाही तर पीडित मुलीच्या आजीचा राग अनावर झाला, त्यांनी शमशेर आलम यांना चपलेने बदडले. या घटनेनं गावकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यांनी संबंधित प्रिसिंपलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आलम याला अटक करून कोर्टात हजर केले.
समशेर आलम हा दिव्यांग असून त्याच्या डोक्यात विकृती भरलेली आहे असं गावकरी म्हणाले तर आलम मास्टर आहे, डॉक्टर नाही. मागील ८ दिवसांपासून मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. ती रोज शाळेत जायला नकार देत घरातून बाहेर पळून जायची असं तिच्या आईने सांगितले. आईच्या वारंवार विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. सरांनी माझ्या पोटाला हात लावला आणि कुणाला काही सांगू नको असं म्हटलं हे मुलीने आईला सांगितले. हा शिक्षक बनण्याच्या लायकीचा नाही असं संतापलेल्या आजीने भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, शाळेतील प्रिसिंपल खूप चुकीचे काम करतो, त्याचा स्वभाव आधीपासूनच खराब आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांसोबतही तो चुकीचं वागतो. जर कुणी गावकरी त्याची तक्रार करायचा तर त्याला तुला काय करायचे ते कर अशी धमकी देत होता असं गावातील केसाबिर अंसारी या गावकऱ्याने सांगितले. मात्र माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. मी १४ वर्ष या शाळेत कार्यरत आहे. जर गावकऱ्यांना तक्रार होती तर त्यांनी विभागाला कळवायचे होते. आरोप सिद्ध झाले असते तर त्यांनी कारवाई केली असती असा दावा आरोपी समशेर आलम याने केला आहे.