शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी बहिणीनेच रचला होता प्लॅन, फिल्मी स्टाइल करणार होते आरोपीची हत्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 9:04 AM

जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती.

मुंबईमध्ये एका बहिणीने आपल्या भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी असा प्लॅन केला की वाचून हैराण व्हाल. भावाच्या मारेकऱ्यांना मारण्यासाठी आधी तिने त्याला हनी ट्रॅपमध्ये फसवलं, नंतर मित्रांच्या मदतीने त्याला जंगलात नेऊन संपण्याचा प्लॅन केला. पण त्याआधी पोलिसांनी महिलेसहीत ५ लोकांना अटक केली. 

काय आहे प्रकरण?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती. हत्येनंतर सादिक दिल्लीला पळून गेला होता. या घटनेमुळे अल्ताफची बहीण यासमीन धक्क्यात होती आणि तिने भावाच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्णय घेतला. तिने अल्ताफचे मित्र फारूक शेख (20), ओवैस शेख (18), मनीस सैय्यद (20), जाकिर खान (32) आणि सत्यम पांडे (23) यांना सोबत घेतलं आणि यांच्या मदतीने सादिकला मारण्याचा प्लॅन  केला.

असा केला होता प्लॅन

हत्येच्या एक महिन्यानंतर यासमीन आणि अल्ताफचे सर्व मित्र मालवानी भागात भेटले आणि सादिकला मारण्याचा प्लॅन आखला. त्यांनी सादिकला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी यासमीनने फेक इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि सादिकसोबत बोलणं सुरू केलं. यादरम्यान तिने सादिकसोबत प्रेमाचं नाटक केलं. एका आठवड्यानंतर सादिक यासमीनला भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला.

शनिवारी यासमीनने मुंबईतील छोटा काश्मीर भागात सादिकला भेटण्यासाठी बोलवलं. पण ती स्वत: तिथे नव्हती. तिचे ५ मित्र एका रूग्णवाहिकेत सादिकची वाट बघत होते. सादिक तिथे पोहोचताच त्याला किडनॅप करण्यात आलं. ते सादिक घेऊन वसई-नायगांव जंगलात जाणार होते आणि तिथे त्याला मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते.

असा सगळा प्लॅन फिस्कटला

हे सगळं होत असताना एका स्थानिक व्यक्तीने सादिकला जबरदस्ती रूग्णवाहिकेत टाकताना पाहिलं. त्याने १०० नंबर डायल करून याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर परिसरातील पोलिसांना अलर्ट देण्यात आला आणि तपास सुरू झाला. पळून जात असताना आरोपींच्या गाडीतील पेट्रोल संपलं त्यामुळे त्यांनी एक एनोव्हा गाडी भाड्याने घेतली.

पोलिसांनी पकडलं

पश्मिच एक्सप्रेस हायवेवर जेव्हा सगळे आरोपी सादिकला किडनॅप करून दहिसर चेक नाक्यावरून जात होते तेव्हा नाकाबंदी दरम्यान सर्वांना अटक करण्यात आली आणि सादिकचा जीव वाचवण्यात आला. किडनॅप केसप्रकरणी यासमीन आणि तिच्या पाचही मित्रांना पोलिसांनी अटक केली असून तपासही सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईKidnappingअपहरण