Take advantage of the no one at home and house breaking of lakhs by thieves | घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला लाखोंचा डल्ला
घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला लाखोंचा डल्ला

ठळक मुद्दे दिवसाढवळ्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून लाखो रुपयांची घरफोडी केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. रामदास पेंडूरकर (48) यांच्या घरी दिवसाढवळ्या लाखोंची घरफोडी झाली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील इमारतीमध्ये घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरांनी दिवसाढवळ्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून लाखो रुपयांची घरफोडी केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील साई लक्ष्मण मार्गावरील पांचाळ नगर परिसरातील श्री जी दर्शन अपार्टमेंटच्या रूम नंबर 104 मधील राहणारे रामदास पेंडूरकर (48) यांच्या घरी दिवसाढवळ्या लाखोंची घरफोडी झाली आहे. रविवारी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान घरी कोणी नसताना अज्ञात चोराने दरवाजाची कडी व कोंडा तोडून घरात प्रवेश करून 45 हजार रुपयांचे 1 तोळे 5 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 30 हजार रुपयांचे 1 तोळे वजनाचे कानातील सोन्याचे 2 झुमके, 30 हजार रुपयांचे 1 तोळे वजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या, 45 हजार रुपयांचे 1 तोळे 5 ग्राम वजनाचा सोन्याचा हार, 45 हजार रुपयांची 1 तोळे 6 ग्राम वजनाची सोन्याची चेन, 60 हजार रुपयांची 2 तोळे वजनाची सोन्याची हातातली साखळी, 30 हजार रुपयांचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे 2 लॉकेट आणि 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे.


Web Title: Take advantage of the no one at home and house breaking of lakhs by thieves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.