रत्नागिरीत संशयास्पद औषध साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 23:06 IST2020-10-05T23:02:32+5:302020-10-05T23:06:13+5:30

रत्नागिरी शहरात औषधसाठा घेऊन आलेले संशयास्पद २ टेम्पो प्रशासनाने  ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही टेम्पो शहरातील आठवडा बाजार येथे पकडण्यात आल्याची घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

Suspicious drug stocks seized in Ratnagiri | रत्नागिरीत संशयास्पद औषध साठा जप्त

रत्नागिरीत संशयास्पद औषध साठा जप्त

रत्नागिरी - कोल्हापूरहून रत्नागिरी शहरात औषधसाठा घेऊन आलेले संशयास्पद २ टेम्पो प्रशासनाने  ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही टेम्पो शहरातील आठवडा बाजार येथे पकडण्यात आल्याची घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. 
औषधांचा साठा असलेले २ टेम्पो प्रशासनाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ  प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अन्न व औषध प्रशासनाला कळविले़  पोलिसांच्या मदतीने हे दोन्ही टेम्पो आठवडा बाजार येथे अडविण्यात आले़ त्या टेम्पोंची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये इंजेक्शन आणि औषधसाठा असलेले काही बॉक्स आढळून आले़ त्यानंतर त्यांचा पंचनामा करण्यात   आला़ तो साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला़ या औषध साठ्याची अधिक चौकशी जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे़

Web Title: Suspicious drug stocks seized in Ratnagiri