मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:46 IST2025-10-31T17:45:14+5:302025-10-31T17:46:30+5:30
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रजनीशच्या ३ मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
उत्तर प्रदेशातील २६ वर्षीय रजनीश प्रसाद या युवकाचा रात्री उशिरा एका पार्टीतून परतल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी ३ मित्रांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
मृत युवकाचा भाऊ नितीश प्रसादने पोलिसांना सांगितले की, गुरुवारी रात्री ९ रजनीश त्याचा मित्र शेखर, शकील आणि हॅप्पी याच्यासोबत पार्टी करायला गेला होता. रात्री ११ वाजता रजनीशला त्यांनी घरी सोडले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. तो सातत्याने उलट्या करत होता. रजनीशने कदाचित जास्त दारू प्यायल्याने हे होत असेल असं कुटुंबाला वाटले. त्यांनी त्याला आराम करायला दिला. मात्र थोड्यावेळाने तो बाथरूममध्ये कोसळला, त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रजनीशच्या ३ मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कुटुंबाचा दावा काय?
रजनीश आणि शेखर एकाच कंपनीत मॅनजर पदावर काम करत होते. रजनीश हा सीनिअर होता. कंपनीशी निगडीत वर्चस्व स्पर्धेत पार्टीवेळी मित्रांनी त्याला काहीतरी चुकीचे खायला दिले. ज्यातून रजनीशचे शरीर काळे निळे पडले होते असा आरोप कुटुंबाने केला. रजनीश तीन भावांमध्ये सर्वात मोठा होता. पोलीस या घटनेत रजनीशच्या पोस्टमोर्टम रिपोर्टच्या अहवालाची प्रतिक्षा करत असून पुढील तपास त्यावर अवलंबू असल्याचे पोलिसांनी म्हटलं.