शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:02 IST

Murder Case : दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती.

बांसवाडा : राजस्थानच्या बांसवाडा पोलिसांनी ६ दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा खुलासा केला आहे. पोलिसांनी हत्येतील दोन आरोपींना जयपूर येथून अटक केली. दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती.बांसवाडा शहरातील अंबावाडी परिसरात गेल्या २९ मार्चच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणाचा खुलासा कोतवाली पोलीस ठाण्याकडून करण्यात आला आहे. कालिका माता परिसरात राहणारा अजय आणि त्याच्यासोबत काम करणारा मित्र राज सिंगचा यांना इंदिरा कॉलनीत राहणारा २४ वर्षीय समीर खान याच्या हत्येप्रकरणी जयपूर येथून अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयला समीर आणि त्याच्या पत्नीमध्ये संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने साथीदारासह हा गुन्हा केला. आरोपींनी मृताच्या अंगावर 10 वार करून त्याची हत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चष्म्याच्या आधारे पोलिसांना या आरोपींचा सुगावा लागला. पोलिसांनी चष्म्याबाबत चौकशी सुरू केली असता तो अजय भोईचा असल्याचे उघड झाले, त्यानंतर पोलीस अजयच्या घरी गेले असता तो तेथे आढळून आला नाही तर त्याचा मित्र राजसिंगही बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला, पोलिसांचे एक पथक गुजरातला गेले, तेव्हा आरोपी जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली.तेथे आरोपींनी ऑटोचालकाकडून मोबाईल घेऊन बांसवाडा येथील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याचा पत्ता बांसवाडा पोलिसांना लागला, पोलिसांनी ऑटो चालकाशी संपर्क साधून जयपूर पोलिसांना माहिती दिली आणि दोन्ही आरोपींना जयपूर येथून अटक केली. एसपी राजेश कुमार मीना आणि डीएसपी सूर्यवीर सिंह राठोड यांच्या निर्देशानुसार कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी रतन सिंह चौहान यांनी हा संपूर्ण खुलासा केला आहे.राजेश कुमार मीना, एसपी बन्सवारा यांनी सांगितले की, 29 मार्चच्या रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात 1 व्यक्तीचा खून झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच आमची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली, आम्ही मृताची ओळख पटवली. मृत समीर अन्सारी हा मूळचा यूपीचा असून गेल्या 10 वर्षांपासून येथे काम करत होता. मग टीम तयार करून सर्वत्र शोध सुरू केला. घटनास्थळी सापडलेल्या चष्म्याच्या आधारे आम्ही आरोपींना ताब्यात घेतले. जयपूर पोलिसांच्या मदतीने अजय आणि मित्र राज सिंग यांना अटक करण्यात आली. आरोपी अजय आणि मृत यांच्यातील परस्पर वैर या हत्येचे कारण ठरले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकGujaratगुजरातRajasthanराजस्थान