कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:57 IST2018-11-16T21:57:00+5:302018-11-16T21:57:34+5:30
कळंबोली पोलीस ठाण्याच्या कॅप्टन बारमध्ये अवैध डान्सबार सुरु असायचा. यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी बारवर छापा टाकून कारवाई केली होती

कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन
नवी मुंबई - विनापरवाना डान्सबारप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याच्या कॅप्टन बारमध्ये अवैध डान्सबार सुरु असायचा. यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी बारवर छापा टाकून कारवाई केली होती.