शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 21:16 IST

NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे.

ठळक मुद्देनिलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला होता.दविंदर सिंगला यावर्षी ११ जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाने कुलगाममधील मीर बाजार येथून दहशतवाद्यांसह अटक केली होती.

जम्मू-काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये पकडलेल्या डीएसपी दविंदर सिंगला जामीन मिळाला असून NIA ने सोमवारी याप्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. दिल्लीच्या कोर्टाने दविंदर सिंग यांना जामीन मंजूर केला होता. निलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र, NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्याने संवेदनशील माहिती दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जानेवारीत दविंदर सिंगला पकडण्यात आलेदविंदर सिंगला यावर्षी ११ जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाने कुलगाममधील मीर बाजार येथून दहशतवाद्यांसह अटक केली होती. या दिवशी तो कर्तव्यावर हजर नव्हता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिंग यांनी १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत सुट्टी घेण्यासाठी अर्ज केला होता. सिंग यांनी एसपी म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत ते एसपी होणार होता.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगलाही शौर्यासाठी पदक देण्यात आले होते. जम्मू-काश्मीर प्रशासनाने ते परत घेण्याचे आदेशही जारी केले होते. दहशतवाद्यांसमवेत डीएसएपी दर्जाच्या अधिकाऱ्याला  पकडणे हे एक मोठे यश मानले जात होते. त्यानंतर दविंदर सिंगलाही दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, ते दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगबरोबर दहशतवाद्यांसारखेच वागणूक देत आहेत. त्यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “शोपियाचे एसपी यांना एक सूचना मिळाली होती की, दोन दहशतवादी आय -10 कारमधून निघाले आहेत आणि राष्ट्रीय महामार्गावर जम्मूला जात आहेत. एसपीने मला सांगितले आणि मी दक्षिण काश्मीरचे डीआयजी यांना त्यांच्या भागात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. नाकाबंदीदरम्यान दोन वॉन्टेड असलेले दहशतवादी कारमधून सापडले होते आणि त्यांच्याबरोबर आमच्या फोर्सचा एक डीएसपीही सापडला. तेथे स्थानिक अ‍ॅडव्होकेटही होते. "

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसPakistanपाकिस्तानNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा