अल्पवयीन युवतीवर बलात्कार करुन फरार झालेल्या संशयितास तेलंगणामध्ये बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 22:49 IST2019-08-28T22:49:34+5:302019-08-28T22:49:53+5:30

गोव्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेल्या जब्बार अंगुरा (28) या संशयिताच्या गोवा पोलिसांनी तेलगंणा राज्यातील तेलंगणा राज्यातील जुन्या हैदराबाद सीटीमध्ये मुसक्या आवळल्या. 

Suspected who rape on minor girl arrested from Telangana | अल्पवयीन युवतीवर बलात्कार करुन फरार झालेल्या संशयितास तेलंगणामध्ये बेड्या

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करुन फरार झालेल्या संशयितास तेलंगणामध्ये बेड्या

मडगाव - गोव्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेल्या जब्बार अंगुरा (28) या संशयिताच्या गोवा पोलिसांनी तेलगंणा राज्यातील तेलंगणा राज्यातील जुन्या हैदराबाद सीटीमध्ये मुसक्या आवळल्या.  तो तेलंगणा येथील रहिवाशी असल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.

आज बुधवारी या संशयिताला न्यायालयापुढे उभे केले असता, त्याला अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मे महिन्यात बलात्काराची ही घटना घडली होती. सोळा वर्षीय एका अल्पवयीन मुलीला फसवून संशयिताने तिच्यावर बलात्कार केला होता. धमकी देउन पैसेही उकळले होते. मागाहून तो फरार झाला होता.

भारतीय दंड संहितेंच्या 376,363, 354, गोवा बाल कायदा कलम 8 तसेच बाल सरंक्षण कायदयाखाली गुन्हा नोंद केला होता. पोलीस या संशयिताच्या शोधात होते. जुन्या हैदराबाद शहरात जब्बार हा असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मडगाव पोलिसांचे एक पथक तेलगंणा राज्यात रवाना झाले होते. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजय कोरगावकर व पोलिसांनी संशयिताला पकडले. पुढील तपास चालू आहे.
 

Web Title: Suspected who rape on minor girl arrested from Telangana