डाेक्यात दगड घालून खून केल्याचा संशय; जुन्या रेल्वेस्थानक परिसरात एका व्यक्तीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:18 IST2021-12-21T19:18:01+5:302021-12-21T19:18:39+5:30
Murder Case :पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गांधी चाैक येथील जुन्या रेल्वे स्थानकात एका ४० वर्षीय अनाेळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास समाेर आली.

डाेक्यात दगड घालून खून केल्याचा संशय; जुन्या रेल्वेस्थानक परिसरात एका व्यक्तीची हत्या
लातूर : शहरातील जुन्या रेल्वे स्थानक परिसरात एका ४० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देत पंचनामा केला असून, मयताच्या डाेक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. त्या दिशेने पाेलीस तपास करत आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गांधी चाैक येथील जुन्या रेल्वे स्थानकात एका ४० वर्षीय अनाेळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास समाेर आली. गांधी चाैक ठाण्याला माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सडपातळ बांधा, कमी उंचीचा पुरुष जातीचा मृतदेह असून, घटनेपूर्वी किमान चार ते पाच तास आधी डाेक्यात दगड घातला असावा, असा संशय पाेलिसांना आहे. मयताच्या शरिरावर हानवटी, ओठावर आणि डाेळ्याच्या वरच्या बाजूला जबर जखम आहे. घटनास्थळी रक्त पडलेले आहे. पाेलिसांनी रक्त लागलेला दगड जप्त केला आहे. मयत व्यक्तीच्या अंगात फिकट रंगाच्या लाईनचा पांढरा शर्ट, राखाडी रंगाची चाैकडा पॅन्ट व पायात प्लास्टीकचा बूट आहे. पाेलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दगडाने ठेचून केला खून?
घटनास्थळी पडलेल्या रक्त आणि मृतदेहाच्या डाेक्यासह चेहऱ्यावर असलेल्या जखमांवरुन त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेले दगड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि तपासातून अन्य काही बाबी समाेर येतील, असे लातूरचे उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे म्हणाले.