मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 05:32 PM2020-05-25T17:32:54+5:302020-05-25T17:36:07+5:30

याच दरोड्याच्या रकमेतून तो माओवादी संघटनेला मदत करत असल्याची माहिती एटीसला मिळाली असून त्यानुसार तपास सुरू आहे.

Suspected Maoist arrested from Mumbai, action taken by Daya Nayak squad pda | मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई

मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देएटीएसने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे नवी मुंबई त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुह्यांची नोंद आहेत.दलविरसिंग बलवंतसिंग रावत ( ३४) उर्फ पप्पू नेपाळी असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह देशभरात दरोडे, जबरी चोरीचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

मुंबई : लूटीच्या उद्देशाने शस्त्रासह मुंबईत आलेल्या संशयित माओवादीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. दलविरसिंग बलवंतसिंग रावत ( ३४) उर्फ पप्पू नेपाळी असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह देशभरात दरोडे, जबरी चोरीचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. याच दरोड्याच्या रकमेतून तो माओवादी संघटनेला मदत करत असल्याची माहिती एटीसला मिळाली असून त्यानुसार तपास सुरू आहे.


एटीएसने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे नवी मुंबई त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुह्यांची नोंद आहेत. त्यानुसार त्याच्याकडे एटीएस कसून चौकशी करत आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याचं नाव दलविरसिंग बालवतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पू नेपाळी असल्याचं उघडकीस आलं. पप्पू नेपाळी याने आतापर्यंत 30 दरोडे टाकले आहेत. तो मोठमोठे दरोडे टाकायचा. आरोपी पप्पू हा नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात होता. दरोड्यात मिळालेली रक्कम तो माओवाद्यांना द्यायचा. त्या पैशाचा वापर घातपाती कारवाया करण्यासाठी केला जात होता.

 

Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

 

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

 

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

Web Title: Suspected Maoist arrested from Mumbai, action taken by Daya Nayak squad pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.