बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:36 PM2020-05-23T20:36:24+5:302020-05-23T20:40:42+5:30

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला असता, शेजारच्या भागात राहणारा एक तरुणही फरार असल्याचे आढळले.

Murder of 9 years old girl, family members allegations of raping pda | बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

googlenewsNext
ठळक मुद्दे संशय वाढला असता पोलिसांनी आरोपी युवकाचा शोध सुरू केला आणि त्याला पिलखवा येथून अटक करण्यात आली. बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे. त्याआधारे पोलीस चौकशी करत आहेत.

गाझियाबाद येथील मोदीनगर पोलीस ठाण्यात एका ९ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलगी बेपत्ता झाली होती, ज्याची हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला असता, शेजारच्या भागात राहणारा एक तरुणही फरार असल्याचे आढळले.


संशय वाढला असता पोलिसांनी आरोपी युवकाचा शोध सुरू केला आणि त्याला पिलखवा येथून अटक करण्यात आली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी युवकानेच सांगितले की, त्याने मुलीला भुरळ घातली आहे आणि त्याने मुलीची हत्या केली आहे. पोलिसांनी बुधवारी मुलीचा मृतदेहही ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे. त्याआधारे पोलीस चौकशी करत आहेत.

मोदीनगरमध्येच आरोपी युवक पीडितेच्या कुटूंबाच्या शेजारी राहत होता. गौरव असे या युवकाचे नाव आहे. गौरव भाड्याने राहतो. मोदीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार आरोपी अल्पवयीन मुलीला फसवून तिच्या मुलीला घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीला  अटक केली आहे. पोलिसांनी कडक चौकशी केली असता त्याने कबूल केले की, त्याने मुलीला आमिष दाखवून आपल्यासोबत आणले. मुलीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह भोजपूर परिसरातील शेतात ठेवला. मुलीवर बलात्कार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिस आरोपीकडे चौकशी करत आहेत.

 

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

Web Title: Murder of 9 years old girl, family members allegations of raping pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.