शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

Crime News: पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय; JDU नेत्याने जिम ट्रेनरवर गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 2:01 PM

Crime News Bihar: जेडीयूच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खूशबूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 26 वर्षीय जिम ट्रेनची हत्या करण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचला आणि अज्ञात लोकांना सुपारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बिहारच्या पटनामध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. सत्ताधारी जनता दल युनायटेडच्या नेत्याने पत्नीच्या जिम ट्रेनरवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकरणी त्या नेत्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिम ट्रेनरवर उपचार सुरु आहेत. (patna gym trainer assault illegal affairs jdu leader and wife arrested)

जेडीयूच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खूशबूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 26 वर्षीय जिम ट्रेनची हत्या करण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचला आणि अज्ञात लोकांना सुपारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कदम कुवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताची आहे. जिम ट्रेनर विक्रम हा स्कूटीवरून जिममध्ये जात  होता. यावेळी त्याची वाट पाहत असलेल्या काही अज्ञातांनी त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. विक्रम 5 गोळ्या लागूनही कसाबसा 2.5 किमी स्कूटी चालवत हॉस्पिटलला पोहोचला. तेथे त्याच्यावर ऑपरेशन करून गोळ्या काढण्यात आल्या. 

शुद्धीवर येताच त्याने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. सुरुतावातीच्या चौकशीत खूशबू आणि विक्रम हे एकमेकांना ओळखतात आणि तासंतास फोनवर बोलत असल्याचे समोर आले आहे. जानेवारीपासून आजवर या दोघांमध्ये जवळपास 1100 वेळा फोनवर बोलणे झाले आहे. या दोघांमध्ये काहीतरी लफडे सुरु असल्याचा संशय खूशबूचा पती डॉ राजीव कुमार सिंहला होता. त्यामुळे एप्रिलमध्ये त्याने विक्रमला मारण्याची धमकी दिली होती. या गोळीबारात चार ते पाच शूटर होते. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड