सुशील कुमारला कोर्टाने दिला दणका; पूरक आहारासाठी केलेली याचिका फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:02 PM2021-06-10T21:02:16+5:302021-06-10T21:06:16+5:30

Sushil Kumar : बुधवारी दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारची विशेष आहाराची विनंती फेटाळून लावली. 

Sushil Kumar slapped by court; Petition for supplementary diet rejected | सुशील कुमारला कोर्टाने दिला दणका; पूरक आहारासाठी केलेली याचिका फेटाळली 

सुशील कुमारला कोर्टाने दिला दणका; पूरक आहारासाठी केलेली याचिका फेटाळली 

Next
ठळक मुद्देयाचिकाद्वारे सुशीलने तुरुंगात विशेष जेवणाची आणि पूरक आहार देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.

कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला दिल्लीतील एका न्यायालयाने दणका दिला आहे. सुशीलने तुरुंगात विशेष जेवणाची आणि पूरक आहार देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.पैलवान सागरच्या खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटू सुशील कुमार याला तुरूंगात विशेष अन्न आणि पूरक आहार दिला जाणार नाही. बुधवारी दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारची विशेष आहाराची विनंती फेटाळून लावली. 


सुशील कुमार यांचे वकील प्रदीप राणा यांनी सांगितले होते की, सुशीलची तब्येत अबाधित ठेवण्यासाठी खास पौष्टिक आहार आणि पूरक आहाराची खूप गरज आहे. म्हणूनच सुशीलने तुरुंगात विशेष अन्न आणि पूरक आहार मिळविण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सुशील  आईसोलेट व्हे प्रोटीन, ओमेगा-थ्री कैप्सूल, ज्वॉइंटमेंट कैप्सूल, प्री-वर्कआउट सी4, मल्टीविटामिन आदी पूरक आहार घेतो.  न्यायाधीश सतवीर सिंह लांबा यांनी सुशील कुमारची याचिका फेटाळून लावली. न्या.लांबा म्हणाले, अशा प्रकारचे जेवण आणि पूरक आहार ही आरोपची इच्छा आहे आणि ती गोष्ट गरजेची नाही.  

२३ वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलम्पिक पदक विजेता सुशील कुमारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. दिल्लीपोलिसांकडून सुशीलचा शस्त्रास्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. लायसन्स विभागाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिल्लीपोलिसांनी दिली. याआधी उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केल्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. शस्त्र परवाना देखील गमावून बसला आहे. 

Web Title: Sushil Kumar slapped by court; Petition for supplementary diet rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app