शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 20:39 IST

कोणाला तरी वाचवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशाचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप राणेंनी केला आहे.तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार  झाला आहे, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे. त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत आहे असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशाचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप राणेंनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरुद्ध बिहार सरकार यांच्यात मतभेदाची भिंत निर्माण झाली आहे. या वादात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. मुंबई पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही. मात्र, बिहारमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही' असा सवाल राणेंनी उपस्थितीत केला.सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सलियन होती. तिने आत्महत्या केली. पण या आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार  झाला आहे, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यानंतर घरातील नोकरा दोन तासाने कळलं की, त्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर ठराविक रुग्णवाहिका का बोलावली? हॉस्पिटलला का नेण्यात आले होते' असे अनेक सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत. दिनू मोरया कोण आहे? त्याच्या घरी अनेक मंत्री का जातात. त्याच्या घरी मंत्री आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे?  अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहे.' असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

 

मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली 

 

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMurderखूनNarayan Raneनारायण राणे Rapeबलात्कार