शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 6:14 PM

Sushant Singh Rajput Suicide : या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता.ईडीला पोलीस तपासाची प्राथमिक माहिती दिली. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मुंबई -  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचं तपास करताना पोलिसांना स्पष्ट झालं आहे. सुशांतने सुरू केलेल्या कंपन्यांमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब आर्थिक अफरातफर करत होते का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. बिहारपोलिसांच्या विनंतीवरुन अंमलबजावणी संचालनालयाने (ED) प्राथमिक माहिती घेऊन आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीआधारे बिहार पोलिसांचे एक पथक तपास करण्यासाठी मुंबईत आले. दरम्यान, रियाने धावपळ करत सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सुशांत आत्महत्येचा तपास मुंबईतच केला जावं अशी मागणी करणारी याचिका केली होती. बिहार पोलिसांनी सुशांतच्या सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासले. या तपासानंतर बिहार पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करणाऱ्या ईडीला एक पत्र पाठवले. पत्राद्वारे बिहार पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासणीची गरज असल्याचे सांगून चौकशी करण्याची विनंती केली. ईडीने मागणी केल्यानंतर बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांकडून प्राप्त तक्रारीची प्रत त्यांना पाठवून दिली आहे. 

 

ईडीला पोलीस तपासाची प्राथमिक माहिती दिली. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. आता रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा महिना उलटून गेल्यानंतरही रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपाच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास CBIनं करावा अशी मागणी केली आहे.

 

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही सर्व स्थरातून होऊ लागली आहे. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.“सुशांतच्या मृत्यू प्रकरणी बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा तपास करावा असं भाजपाला वाटतं,” असे सुशील कुमार मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसBiharबिहारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbankबँक