शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:08 IST

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती.

पटना : सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वादावरून बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केले. ‘छिछोरे या सिनेमानंतर सुशांतने 7 सिनेमे साइन केले होते. मात्र सहा महिन्यांतच त्याच्या हातून हे सर्व सिनेमे काढून घेण्यात आलेत. याच कौर्याने एका प्रतिभावान कलाकाराचा बळी घेतला,’ असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

सुशांत सिंग राजपूत हा मुळचा बिहारचा होता. त्याच्यावर अन्याय करण्यात आला. सुशांतकडून सात सिनेमे काढून घेण्यात आले. तसेच त्याच्या काही फिल्मस प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. याविरोधात मी तक्रार दाखल केली असून अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केल्याने सुशांतने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचा आरोप वकील सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे. 

तसेच दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले. 

 सुशांतची आत्महत्यासुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. यानंतर सोशल मिडीया आणि वृत्तवाहिन्यांवर बॉलिवूडमधील कृत्यांची चर्चा होऊ लागली. यावरून मुंबई पोलिसांनी ट्विट करत या अँगलनेही तपास करणार असल्याचे स्पष्ट केले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी

India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतbollywoodबॉलिवूडSalman Khanसलमान खानEkta Kapoorएकता कपूरKaran Joharकरण जोहरSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीBiharबिहार