शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:45 IST

राजपूतवर उपचार करणार्‍या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील  डॉ. केर्सी चावडा या मानसोपचार तज्ज्ञांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

ठळक मुद्दे२० जूनपर्यंत पोलिसांनी १६ जणांची चौकशी केली होती. आता सोमवारी, २२ जून रोजी पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतची सर्वात जवळची मैत्रीण असलेल्या रोहिणी अय्यर हिची चौकशी केली.अय्यर वांद्रे पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता आली आणि चौकशी पथकाने ९ तासांहून अधिक वेळ राजपूतबाबत चौकशी केली.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. राजपूतचा मित्र सिद्धार्थ पितानी आणि जवळची मैत्रीण रोहिणी अय्यर यांची वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. अय्यर हिने राजपूतवर इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिलेली होती. यापूर्वी तिने त्याच्याबरोबर त्याच्या प्रसिद्धीचे कामकाज हाताळले होते.अय्यर वांद्रे पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता आली आणि चौकशी पथकाने ९ तासांहून अधिक वेळ राजपूतबाबत चौकशी केली. तिचा जबाब नोंदविण्यात आला, तर या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी इतर दोन जणांनाही समन्स बजावले आहेत. 

सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. बऱ्याच अहवालानुसार तो नैराश्याने ग्रस्त होता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याने आत्महत्यासारखे कठोर पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. २० जूनपर्यंत पोलिसांनी १६ जणांची चौकशी केली होती. आता सोमवारी, २२ जून रोजी पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतची सर्वात जवळची मैत्रीण असलेल्या रोहिणी अय्यर हिची चौकशी केली.मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी अय्यर सोमवारी सकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात आली आणि दुपारनंतर तेथून निघाली. मात्र, रोहिणीने आपल्या जबाबत काय म्हटले आहे, याबद्दल माहिती मिळालेली नाही. परंतु, बर्‍याच अहवालात असे म्हटले आहे की, सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या  मैत्रीबद्दल अय्यरला प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंगच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. राजपूतवर उपचार करणार्‍या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील  डॉ. केर्सी चावडा या मानसोपचार तज्ज्ञांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, डॉ.चावडा यांनी व्यस्त कामकाजामुळे वांद्रे पोलिसांकडे हजर होण्यासाठी आणखी पुढील तारीख मागितली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

 

 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिस