शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर

By पूनम अपराज | Published: September 29, 2020 9:08 PM

Sushant Singh Rajput Case : रिया सध्या भायखळा कारागृहात असून NCB लवकरच अन्य तारकांविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते NCB च्या रडारवर आले आहेत.

ठळक मुद्देएनसीबीने आपल्या तपासाच्या कक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही अडचण वाढणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 3 बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज अँगलच्या चौकशीच्या फेरीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं उघडकीस आली. NCB या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रित सिंह यांच्यासारख्या अभिनेत्रींची चौकशी NCB ने केली आहे. रिया सध्या भायखळा कारागृहात असून NCB लवकरच अन्य तारकांविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते NCB च्या रडारवर आले आहेत.

 

आजकाल ड्रग्जच्या वादळाने चित्रपटसृष्टीत कहर ओढवला आहे. या प्रकरणात, जिथे बॉलिवूड देखील दोन गटात विभागलेला दिसतो, तसा हा विषय आता देशभर चर्चेत आला आहे. ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत. अजून अभिनेत्यांची नावे उघडकीस येणं बाकी असल्याचं निकम म्हणाले होते. 

एनसीबीने आपल्या तपासाच्या कक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही अडचण वाढणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 3 बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यामुळे अभिनेत्रीनंतर आता बडे अभिनेत्यांची चौकशीची होणार का? याकडे बॉलिवूड सृष्टीचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असताना एनसीबीच्या जवळपास १५ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी बाहेरुन २ ते ३ टीम बोलावण्यात आल्या आहेत.एनसीबी दिपीकासह अन्य अभिनेत्रींच्या जप्त केलेल्या फोनमधील डिलीट डाटा पुन्हा मिळवत आहे. या तपासात बॉलिवूडमधील काही मोठे अभिनेत्यांची नावं समोर येत असल्याने जप्त केलेल्या या फोनमधील डाटा महत्त्वाचा ठरणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या फोनमध्ये याबाबत महत्त्वाचे पुरावे मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या डाटामधून एनसीबीला संशयित अभिनेत्यांविरोधात पुरावे सापडल्यास त्यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनसीबी येत्या काळात अभिनेत्यांना समन्स बजावू शकते. बॉलिवूडचे हे ए-लिस्टर अभिनेते  या अभिनेत्रींसोबत पार्टीत सहभागी झाले होते. या हाय प्रोफाईल पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे हाती लागले तर एनसीबी या अभिनेत्यांना देखील समन्स पाठवण्याची शक्यता आहे.ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. अभिनेत्री दीपिका पादुकोण असो किंवा सारा अली खान सगळ्या ड्रग्स प्रकरणात फसताना दिसतायेत. दीपिका, सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी एनसीबीने केली आहे. तिनही अभिनेत्रींचे फोन एनसीबीने जप्त केले आहेत. चौकशी दरम्यान सारा अली खान म्हणाली तिने कधीच ड्रग्स घेतले नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ड्रग्स न घेतल्याचे सांगितले आहे.  आजतकच्या रिपोर्टनुसार साराने एनसीबीसमोप सांगितले की, केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर सुशांतने तिच्यासमोर ड्रग्स घेतले होते. श्रद्धाने ही स्वत: कधीच ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे सांगितले पण सुशांत ड्रग्स घ्यायचा असे तेही म्हणाली. रिया चक्रवर्तीच्या जबाबानुसार एनसीबीने सारा आणि श्रद्धाची चौकशी केली. मात्र या दोघींचे ड्रग्सबाबत कोणतचे चॅट नाही आहेत.

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDeepika Padukoneदीपिका पादुकोणShraddha Kapoorश्रद्धा कपूरSara Ali Khanसारा अली खानbollywoodबॉलिवूड