शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सुशांत सिंग प्रकरणामुळे दोन राज्याच्या पोलिसांत मतभेदाची भिंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 7:19 PM

हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासात अडथळ्याची भीती

ठळक मुद्दे सुशांत सिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस काही दिवसांपासून मुंबईत धावपळ करीत आहेत. सुशांत सिंगच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या महाराष्ट्र आणि बिहार पोलीस दलातील मतभेदांमुळे भविष्यात या कोऑर्डिनेशन कमिटीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नरेश डोंगरेनागपूर : देशभर चर्चेचा विषय ठरलेला सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीने बिहार आणि महाराष्ट्र पोलीस दलात मतभेदाची भिंत निर्माण झाली आहे. या घडामोडींचा विपरीत परिणाम इंटरस्टेट पोलीस कोऑर्डिनेट कमिटीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सुशांत सिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस काही दिवसांपासून मुंबईत धावपळ करीत आहेत. मात्र त्यांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड आहे. या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे बोलले, दाखवले (टीव्हीवर) जात असल्यामुळे भविष्यात बिहारसह अन्य प्रांतातील पोलिसांकडूनही महाराष्ट्र पोलिसांना हाय प्रोफाईल केसेस मध्ये चौकशी साठी मदत केली जाणार नाही, अशी शक्यता वजा भीती वरिष्ठ पोलीस अधिकारी 'ऑफ द रेकॉर्ड' व्यक्त करीत आहेत. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी आणि या प्रांतातून  त्या प्रांतात पळून गेलेल्या मोठ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी देशातील विविध प्रांताच्या पोलीस दलाची एक इंटरस्टेट को-ऑर्डिनेशन कमिटी बनविण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून एका राज्यातील पोलिसांना दुसऱ्या राज्यातील पोलिसांची गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी चांगली मदत मिळते. मात्र, सुशांत सिंगच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या महाराष्ट्र आणि बिहार पोलीस दलातील मतभेदांमुळे भविष्यात या कोऑर्डिनेशन कमिटीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिस्तीचे दल असल्यामुळे अनेकदा उघडपणे पोलीस अधिकारी काही बोलत नाही. मात्र हा मुद्दा खाजगीत चांगलाच गरम झाला आहे.वेगवेगळे मतप्रवाहया संबंधाने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळे मत आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते बिहार पोलिसांकडे आलेल्या तक्रारी रेकॉर्ड करून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे वर्ग कराव्यात. त्या तक्रारीची चौकशी मुंबई पोलीस करून त्यासंबंधातील तथ्य बिहार पोलिसांना कळवतील. यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी याच पदावरील बिहारच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकाशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या चर्चेतून चौकशीला गती मिळू शकते, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. तर, बिहारमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना चौकशीचा अधिकार असल्याचे मत एका शिर्षस्थ निवृत्त अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर लोकमत'शी बोलताना मांडले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याnagpurनागपूरPoliceपोलिस