पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 22:01 IST2019-09-13T21:31:12+5:302019-09-13T22:01:01+5:30
मुख्यमंत्री शहरात येणार असताना आंदोलन करू न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना समन्स
पिंपरी : पिंपरी : मुख्यमंत्री शहरात येणार असताना आंदोलन करू न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. त्यानुसार सोमवारी (दि. १६) आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मारुती भापकर यांनी मानवी हक्क आयोगाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ह्यअटल संकल्प महासंमेलनह्ण आयोजित करण्यात आले होते. या वेळी आंदोलन करण्याबाबत मारुती भापकर यांनी निगडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांना निवेदन दिले. आंदोलन करता येणार नाही, असे सांगून भापकर यांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर रोजी मोहननगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख व इतर दोन पोलीस कर्मचाºयांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भापकर यांना त्यांच्या घरून पिंपरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी नोटीस देऊन भापकर यांना ताब्यात घेतले. रात्री साडेआठपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले. दरम्यान त्यांना पाणी व जेवण दिले नाही.
संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली झाली, असे भापकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त पद्मनाभन, तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, प्रदीप लोंढे, सहायक पोलीस आयुक्त अन्सार शेख, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सात प्रतिवादींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसान भरपाई म्हणून एक रुपया देण्यात यावा, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.
भापकर यांनी दाद मागितल्यानुसार मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. याप्रकरणी सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी समन्स बजावलेल्या प्रतिवादींनी मानवी हक्क आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
[9:49 ढट, 9/13/2019] ऊीीस्रं‘ ङ४’‘ं१ल्ल्र: ॅँी३’्र ंंँी