निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:16 IST2020-02-27T20:15:11+5:302020-02-27T20:16:16+5:30
निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. मोहित प्रकाश शेळके (वय २१) असे मृताचे नाव आहे. मोहित हा इलेक्ट्रिशियन होता.

निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. मोहित प्रकाश शेळके (वय २१) असे मृताचे नाव आहे. मोहित हा इलेक्ट्रिशियन होता. तो गोधनी मार्गावरील स्वामीकृपा आराधना हाऊसिंग सोसायटीत राहत होता. मोहितचे वडील प्रकाश शेळके पोलीस खात्यातून एएसआय म्हणून निवृत्त झाले आहेत. घरची मंडळी कामात असल्याचे पाहून बुधवारी सायंकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. घरच्यांनी मोहितला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रकाश अभिमान शेळके यांच्या तक्रारीवरून मानकापूरचे पोलीस उपनिरीक्षक रणदिवे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मोहितच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.