'भावपूर्ण श्रध्दांजली' असा स्टेटस ठेवत राशिवडेतील संग्रामची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:56 IST2022-09-21T20:56:12+5:302022-09-21T20:56:52+5:30

कौटुंबिक वादातून संपवले आयुष्य

Suicide of Sangram in Rashivade keeping the status as 'Emotional Tribute' | 'भावपूर्ण श्रध्दांजली' असा स्टेटस ठेवत राशिवडेतील संग्रामची आत्महत्या

'भावपूर्ण श्रध्दांजली' असा स्टेटस ठेवत राशिवडेतील संग्रामची आत्महत्या

अमर मगदूम, राशिवडे: भावपूर्ण श्रध्दांजली स्टेटस ठेवत राशिवडे बु (ता.राधानगरी) येथील संग्राम मधुकर कांबळे (वय ३२) या युवकाने स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोन वाजता घडली. संग्रामने स्वत:च्या मोबाईल मध्ये आत्महतेस पत्नी, सासू, सासरे, मेहुण्या आणि त्यांचे पती यांना जबाबदार धरुन त्यांना कडक शिक्षा व्हावी, असे अडीच मिनिटांचे दोन व्हिडीओ केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर कांबळे यांचा मुलगा संग्राम कांबळे याचे लग्न तीन वर्षापुर्वी कोल्हापूर येथील कोमल सखाराम कांबळे हीच्याशी झाले होते. परंतु लग्नानंतर कौटुंबिक वादामुळे पत्नी अडीच वर्षापासून माहेरीच राहत होती. त्यांंचा वाद न्यायालयात सुरु होता. संग्रामने अडीच मिनीटाचे दोन व्ही.डी.ओ. तयार करुन त्यामध्ये पत्नी, सासु, सासरे, दोन मेहुण्या व त्याचे पती यांनी आत्महत्येस प्रवृत केल्याचे म्हटले आहे. या सर्वांना कडक शिक्षा व्हावी असे सांगुन स्वत: काढलेल्या कर्जाची आणि त्याच्या येणे बाकीची नावेसुध्दा सांगितली आहेत. या वादामुळे आई, वडीलांना त्रास होत असुन मलाही त्रास होत आहे असेही म्हटले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परीवार आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

Web Title: Suicide of Sangram in Rashivade keeping the status as 'Emotional Tribute'