कारमध्ये सापडली सुसाईड नोट; नदी परिसरात कार सोडत बॅंक कर्मचारी बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:48 IST2021-09-19T17:19:09+5:302021-09-19T17:48:36+5:30
Sawantwadi News : पोलीसांनी कारचा दरवाजा उघडला असून त्यात ही सुसाईड नोट सापडली आहे.

कारमध्ये सापडली सुसाईड नोट; नदी परिसरात कार सोडत बॅंक कर्मचारी बेपत्ता
सावंतवाडी : तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली असून सावंतवाडी शहरात एका खाजगी बँकेत कामाला असलेल्या कारीवडे येथील युवकाची ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली आहे. मनोहर गावडे (३५) असे त्या बॅक कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान कार मध्ये सुसाईड नोट सापडली आहे. त्यामुळे त्या युवकांचा नदी मध्ये शोध घेण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी सावंतवाडी पोलीस दाखल झाले असून नदीत शोध घेण्यात येत आहे.पोलीसांनी कार चा दरवाजा उघडला असून त्यात ही सुसाईड नोट सापडली आहे. तो युवक सावंतवाडीत एका खासगी बँकेत कामाला असून तो मूळचा आंबोली चौकुळचा असला तरी कारिवडे येथे तो स्थायिक झाला आहे.त्याने सुसाईड नोट लिहून काहि टोकाचे पाऊल तर उचलले तर नसेल ना म्हणून ओटवणे येथील नदीत शोध घेतला जात आहे