शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:27 IST

दोन महिलांवर गुन्हा दाखल..

ठळक मुद्देविकत घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते थकल्याने मानसिक तणाव

पुणे : पती अथवा सासरकडील मंडळी विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेतल्याने त्या छळाला कंटाळून त्या आत्महत्या करत असल्याचे आजवर दिसून आले मात्र, विकत घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते देताना न असल्याने झालेल्या वादात चारित्र्याचा संशय घेतल्याने मानसिक तणावातून महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ आंबेगाव खुर्द येथील लेकसृष्टी अपार्टमेंट ही घटना घडली होती़ याप्रकरणी ३० वर्षाच्या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे़ या महिलेच्या पतीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी लेकसृष्टी अपार्टमेंटमधील दोन महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत़ त्याची पत्नी ब्युटी पार्लर चालवित होत्या़ त्यांनी सुमारे ३ वर्षापूर्वी लेकसृष्टी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकत घेतला आहे़ त्या फ्लॅटचे हप्ते ते या दोन महिलांना वेळच्यावेळी देत होते़ लॉकडाऊनमुळे फिर्यादी यांचा रिक्षा व्यवसाय बंद होता़ तसेच पत्नीचे ब्युटी पार्लरही बंद होते़ त्यामुळे घरात पैशाची चणचण भासत होती़ यामुळे ते गेल्या २ महिन्यात हप्ते देऊ शकले नाही़ त्यामुळे १४ जून रोजी दोन हप्ते थकल्यावर या दोन महिलांचे फिर्यादीच्या पत्नीशी भांडणे केले़ त्यावेळी या महिलांनी तिच्यावर अश्लिल आरोप करुन तिच्या चारित्र्याचा संशय घेतला़ त्यामुळे आपण इतके चांगले काम करीत असतानाही बाहेरचे लोक आपल्या चारित्र्याविषयी असे बोलतात, हे ऐकून फिर्यादीच्या मनास धक्का बसला़ त्या मानसिक तणावात त्या घरी आल्या व त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ फिर्यादी हे या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी दोघा महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूWomenमहिला