Suicide : पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:34 IST2021-06-05T21:34:08+5:302021-06-05T21:34:22+5:30
Suicide Case : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील घटना : घराजवळील बाभळीच्या झाडाला घेतला गळफास

Suicide : पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती : पोलीस मुख्यालयात कार्यरत अंमलदाराने घरानजीकच्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मनोहर अंबादास वानखडे (५४, रा. एसआरपीएफ कॅम्प) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मृताचे साडू अनिल भटकर (५०, रा. गुरुकृपा कॉलनी) यांनी पोलिसांना दिली. मृत मनोहर वानखडे हे दारू पिण्याच्या सवयीचे होते. ते पूर्वी एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. आता त्यांची पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. आठ दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. खांद्याच्या दुखण्यामुळे त्यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कानपुरे करीत आहेत.
जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णीhttps://t.co/eQQEogKfKH">https://t.co/eQQEogKfKH
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1401157644715323399?ref_src=twsrc%5…">June 5, 2021
पत्नीने पतीचे दुष्कृत्य आणले उघडकीस; DSP ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कारhttps://t.co/QchU6988ar">https://t.co/QchU6988ar
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1401163737105453059?ref_src=twsrc%5…">June 5, 2021
रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आई;महिलेची शिर धडापासून केलं वेगळंhttps://t.co/ZgCtNTWTBs">https://t.co/ZgCtNTWTBs
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1401199859663736834?ref_src=twsrc%5…">June 5, 2021