पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 20:57 IST2020-10-26T20:57:31+5:302020-10-26T20:57:59+5:30
Suicide: आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही.

पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याची आत्महत्या
ठळक मुद्दे विवेक प्रकाश कदम (२९) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते महागाव येथे पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते.
उमरखेड (यवतमाळ) : येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विवेक प्रकाश कदम (२९) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते महागाव येथे पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोमवारी येथील पाटीलनगरमधील किरायाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ते मूळचे नांदेड येथील रहिवासी आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही.