जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 16:50 IST2018-12-19T16:49:20+5:302018-12-19T16:50:31+5:30
याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाकोल्यातील नोबल अपार्टमेंट या इमारतीत भूमिका सिंग राहत होती.

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने केली आत्महत्या
मुंबई - वाकोला परिसरात एका ३० वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. भूमिका सिंग असं या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाकोल्यातील नोबल अपार्टमेंट या इमारतीत भूमिका सिंग राहत होती.
भूमिका 'वर्ल्डवाईड कम्युनिकेशन ग्रुप डीडीबी मुद्रा ग्रुप'मध्ये कार्यरत होती. तिचे पती विनय सिंगसुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत. भूमिकाने गळफास घेऊन आपलं आयुष्य का संपवलं, याचं कारण अद्याप कळालं नसून वाकोला पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. घटनास्थळी सुसाईट नोट सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.
मुंबई - वाकोला परिसरात एका ३० वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. भूमिका सिंग असं या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाकोल्यातील नोबल अपार्टमेंट या इमारतीत भूमिका सिंग राहत होती.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 19, 2018