लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची वाट पाहात होता पती, पण भावानंच दगा केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:39 IST2022-06-07T15:39:04+5:302022-06-07T15:39:32+5:30

बिहारच्या मोतिहारीमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका नववधूनं लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला दगा दिला आणि जे घडलं त्यानं सर्वांनाच आपली बोटं तोंडात घालायला भाग पाडलं.

suhagraat bride groom looteri dulhan cash gold absconding motihari bihar police | लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची वाट पाहात होता पती, पण भावानंच दगा केला अन्...

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची वाट पाहात होता पती, पण भावानंच दगा केला अन्...

मोतिहारी-

बिहारच्या मोतिहारीमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका नववधूनं लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला दगा दिला आणि जे घडलं त्यानं सर्वांनाच आपली बोटं तोंडात घालायला भाग पाडलं. मधुचंद्राच्या रात्री पतीला मिळाला असा धोका तो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधू दागदागिने, रोकड घेऊन फरार झाली आणि याची कुणालाच कानोकान माहिती मिळाली नाही. पीडित कुटुंबाच्या दाव्यानुसार वधू ४ लाखांचे दागिने आणि १.५० लाख रुपये रोकड घेऊन तिच्या भावासोबत बाईकवरुन फरार झाली. 

पकडीदयाल ठाण्याच्या हद्दीत धनौजी पंचायतीच्या हरनाथपूर परसौनीचे जोगी साह यांचा सुपुत्र आनंद कुमार याचं लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. ९ मे रोजी ढाका ठाणे हद्दीत परसा येथील रहिवासी रामनाथ साह यांची सुकन्या मुन्नी कुमारीसोबत आनंद कुमारचा विवाह सोहळा पार पडला. पती आनंद कुमारसोबत मुन्नी कुमारी सासरी देखील आली. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिचा भाऊ कृष्णा साह आपल्या मित्रांसह इथं आला आणि बहिणीला घेऊन पसार झाला. 

आनंद कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांनी कृष्णा साह याची घरी आल्यावर पाहुणचार केला. रात्री त्याची दुसऱ्या एका खोलीत झोपण्याची व्यवस्था सासरच्या मंडळींनी केली होती. पण रात्री उशिरा संधी साधून वधू मुन्नी कुमारी आपला भाऊ कृष्णासोबत घरातील सर्व दागदागिने आणि रोकड घेऊन लंपास झाली. पती आनंद कुमार यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यानं रात्री उशिरा मोटारसायकलचा आवाज ऐकला आणि त्याला जाग आली. त्यानं पाहिलं तर वधू मु्न्नी कुमारी जागेवर नव्हती आणि कपाटातील सामान अस्थाव्यस्त पडलं होतं. हुंड्यात जी बाईक मिळाली होती ती देखील जागेवर नव्हती. भाऊ कृष्णासह मुन्नी कुमारी बाईकवरुन पळून गेली. 

Web Title: suhagraat bride groom looteri dulhan cash gold absconding motihari bihar police