शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

Bhima Koregaon Case : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला

By पूनम अपराज | Published: September 24, 2020 11:16 PM

Bhima Koregaon Case : भारद्वाजच्या अ‍ॅडव्होकेट वृंदा ग्रोव्हर यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका आज मागे घेतली.

ठळक मुद्देएल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेल्या नागरी अधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळला होता.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मिळण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेेेटाळून लावली आहे. 2018 मध्ये अटक केल्यााानंतरर भायखळा तुरुंगात त्या आहेत. भारद्वाजच्या अ‍ॅडव्होकेट वृंदा ग्रोव्हर यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका आज मागे घेतली.

 

एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेल्या नागरी अधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळला होता. भारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. आपल्यालाही मधुमेह, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब असे आजार आहेत. त्यात कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये ठेवून आपला जीव धोक्यात घालण्यात येत आहे. त्यामुळे अंतरिम जामिनावर आपली सुटका करण्यात यावी, अशी विनंती भारद्वाज यांनी मागे जामीन अर्जात केली होता. त्यांच्या या जामीन अर्जावर विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी आक्षेप घेतला होता.भारद्वाज यांच्यावर बेकायदेशीर हालचाली ( प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करू शकत नाही, असे शेट्टी यांनी न्यायालयाला सांगितले होते.

भायखळा कारागृहातील कैदी व अंडरट्रायल्सना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना असलेल्या आजारावर उपचार करण्यात येतात, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेमध्ये या सर्व लोकांचा हात होता आणि त्याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

Supreme Court refuses to entertain a plea seeking interim bail on medical grounds filed by Sudha Bharadwaj, accused in Bhima-Koregaon case lodged in Byculla women’s prison since her arrest in 2018. Advocate Vrinda Grover appearing for Bhardwaj withdrew the plea from the top court— ANI (@ANI) September 24, 2020

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा