शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 22:38 IST

राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली.

ठळक मुद्देराजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसानाची ही घटना आहे.गावातल्या संदीप नावाच्या तरुणाने गावकऱ्यांकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितले.

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य गोष्टी उपलब्ध नाहीत. सर्व यंत्रणा ठप्प आहे. बँका सुरु असल्या तरी व्यवहारच नसल्याने पैशांची देवाणघेवाण देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पैशांची खूप अडचण भासत आहे. त्यातच राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली. राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसानाची ही घटना आहे.

सुरूवातीला याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. मात्र, ३ गावांमध्ये खात्यात आलेल्या पैश्यांबाबत कुजबूज सुरू झाल्याने सगळ्या लोकांनी अखेर पोलीस ठाणं गाठलं आणि हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितले.  चिकसाना आणि नजीकच्या अन्य दोन गावांमध्ये नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने पहिल्यांदा ते आनंदित झाले आणि नंतर ते घाबरून गेले. अचानक सगळ्यांना मोबाईलवर मेसेज येऊ लागल्याने लोकांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं कळालं. त्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

 

धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

 

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

त्यांच्या गावातल्या संदीप नावाच्या तरुणाने गावकऱ्यांकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितले. त्याने त्याच्या मित्राने नौदलात नोकरी लागण्यासाठी १० लाख रुपये एका व्यक्तीला दिले होते. तरीदेखील नोकरी लागली नाही. त्यातच त्याच्या बहिणीचं लग्न असल्याने त्याला ते पैसे परत घ्यायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रोख रक्कम घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याने शक्कल लढवून गावातल्या अनेकांकडून एटीएम कार्ड्स घेतली. तरुणाने तीन गावांमधील तब्बल ५४ लोकांकड़ून कार्ड घेत कुणालातरी गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. संदीप फरार असून पोलीस तपास करत आहेत. आपल्या बँकेचे डिटेल्स देताना सावध राहा असं आवाहन पोलिसांनी सगळ्यांना केलं आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमRajasthanराजस्थानPoliceपोलिसbankबँक