धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 11:00 PM2020-05-09T23:00:51+5:302020-05-09T23:04:00+5:30

शुक्रवारी दुपारी दफनभूमीवर मद्यपान केल्यास विरोध केल्याने एका 24 वर्षीय व्यक्तीची तीन जणांनी हत्या केल्याची घटना घडली.

Shocking! Opposed to drink liqour at the cemetery; The young man lost his life pda | धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

Next
ठळक मुद्देआरोपींनी पीडितेच्या डोक्यावर हातोडाच्या सहाय्याने कमीतकमी तीन वेळा प्राणघातक हल्ला केला. जिल्ह्यातील बरसट ब्लॉकमधील बामनगची शहरात ही घटना घडली.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या उत्तर 24 येथे एक भयानक घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी दफनभूमीवर मद्यपान केल्यास विरोध केल्याने एका 24 वर्षीय व्यक्तीची तीन जणांनी हत्या केल्याची घटना घडली. आरोपींनी पीडितेच्या डोक्यावर हातोडाच्या सहाय्याने कमीतकमी तीन वेळा प्राणघातक हल्ला केला.

 कसे घडले
जिल्ह्यातील बरसट ब्लॉकमधील बामनगची शहरात ही घटना घडली. अली हुसेन असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्याने दफनभूमीवर तीन जणांना मद्यप्राशन करताना पाहिले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हा परिसर  शांत झाला आहे. येथे बरेच पुरुष सामूहिकरीत्या मद्यपान करताना आढळले. त्यावेळी हुसेन यांनी घटनास्थळावर दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यावर तिघांनी त्याला ठार मारले असा आरोप केला. जेव्हा पीडित मुलाचे वडील मुकुल यांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली, तेव्हा दारूच्या नशेत लोकांनी त्याच्यावरही हल्ला केला. दोन्ही पीडितांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी बारासट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक 

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

 

 

 

पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रूग्णालयात दाखल झाल्यानंतर हुसेन यांचे निधन झाले आणि वडील  मृत्यूशी झुंज देत आहेत. सिराजुल हक, शफिक अली आणि हाफिजुल हक असे तिन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला आहे. जुलै 2016  मध्ये समाजविरोधी कृत्याचा निषेध करत त्याच भागात सौरव चौधरी म्हणून हत्या करण्यात आली होती. या हत्येची ही पुनरावृत्ती आहे.

Web Title: Shocking! Opposed to drink liqour at the cemetery; The young man lost his life pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.