धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:37 PM2020-05-11T12:37:07+5:302020-05-11T12:40:58+5:30

हत्येनंतर त्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले व पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे.

Shocking! Rickshaw driver kills pregnant wife and reaches Thane police pda | धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

googlenewsNext
ठळक मुद्दे दिल्लीच्या दक्षिणपुरी भागात एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली. आरोपी विजयने दीड वर्षांपूर्वी हेमलताशी लग्न केले होते. 28 वर्षीय हेमलता गर्भवती होती.

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना थांबत नाहीत. सर्व कायदे असूनही महिला गुन्हेगारीच्या घटना आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडत आहेत. दिल्लीच्या दक्षिणपुरी भागात एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली. हत्येनंतर त्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले व पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे.

आरोपी विजयने दीड वर्षांपूर्वी हेमलताशी लग्न केले होते. 28 वर्षीय हेमलता गर्भवती होती. रविवारी पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, विजयने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने दक्षिणपुरी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. विजयने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

पोलिसांनी त्याला अटक केली आणि संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हेमलताचा मृतदेह पलंगावर पडला होता. तिच्या नाकावर जखम झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. घरगुती कलह हे घटनेमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी पती व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे सांगितले जात आहे.

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    


विशेष म्हणजे याआधीही दिल्लीत एका हवालदाराने त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मृत पत्नीचा मृतदेह गाडीत सापडला. आरोपी हेड कॉन्स्टेबल फरार झाला.
 

Web Title: Shocking! Rickshaw driver kills pregnant wife and reaches Thane police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.