हृदयद्रावक! लपाछपी खेळता खेळता अचानक कार लॉक झाली; 4 मुलांचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 11:56 AM2021-05-09T11:56:18+5:302021-05-09T11:57:06+5:30

Car park without lock is dangerous in Sunlight: पोलिसांनुसार सिंगोली तगा गावातील ही घटना आहे. यामध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये मुले लपाछपी खेळत होते.

Suddenly the car locked while playing hide and seek; 4 children suffocated to death | हृदयद्रावक! लपाछपी खेळता खेळता अचानक कार लॉक झाली; 4 मुलांचा गुदमरून मृत्यू

हृदयद्रावक! लपाछपी खेळता खेळता अचानक कार लॉक झाली; 4 मुलांचा गुदमरून मृत्यू

Next

बागपत : उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये (Bagpat News) आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घराजवळ लावलेल्या कारमध्ये (Car locked) खेळता खेळता ती लॉक झाल्याने 4 मुलांचा गुदमरून मृत्यू (4 children's died) झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी या मुलांवर अंत्यसंस्कार करण्य़ात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गाडीच्या मालकाने कार लॉक केली नव्हती. जर कार लॉक असली असती तर ही दुर्घटना घडली नसती. (Car locked when children's playing in Uttar Pradesh's Bagpat. 4 died, one serious after suffocation in heat.)


पोलिसांनुसार सिंगोली तगा गावातील ही घटना आहे. यामध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये मुले लपाछपी खेळत होते. घर मालक घरी नव्हता. यावेळी पाच मुले गाडीच्या आतमध्ये अडकली. अचानक कार लॉक झाल्याने श्वास कोंडून चार मुलांचा कारमध्येच मृत्यू झाला. बाजुने जात असताना कोणाच्यातरी ही बाब लक्षात आली. यानंतर शेजाऱ्यांनी गाडीच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढले. यामध्ये एकच बालक जिवंत असल्याचे आढळले. 


या दुर्घटनेत आठ वर्षीय नियती, चार वर्षांची वंदना आणि अक्षय तसेच सात वर्षांचा कृष्णा यांचा मृत्यू झाला. घरच्यांनुसार ही मुले सकाळी 11 वाजल्यापासून घराबाहेर खेळत होती. जेव्हा खूप वेळ झाला तरी घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु करण्यात आली. एका ग्रामस्थाने गाडीमध्ये मुले बेशुद्ध पडल्याचे पाहिले. त्याने गाडीची काच तोडली आणि मुलांना बाहेर काढले. मुलांच्या कुटुंबियांनी कारच्या मालकावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गाडीच्या मालकाने कार लॉक केली नव्हती. जर कार लॉक असली असती तर ही दुर्घटना घडली नसती. गाडीची एक खिडकी उघडी होती. यातून मुले आतमध्ये गेली आणि दरवाजा बंद केले. दरवाजा बंद करताच गाडी आतून लॉक झाली. उन्हात उभी असल्याने आतमध्ये गॅस बनला आणि यामध्ये मुले गुदमरली. 

Web Title: Suddenly the car locked while playing hide and seek; 4 children suffocated to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.