Video : 'त्या' वायरल व्हिडीओतील स्टंटबाज तरुणी अखेर सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:29 IST2018-10-03T19:37:35+5:302018-10-03T21:29:23+5:30
पूजा भोसले असं या स्टंटबाज तरुणीचे नाव असून ती दिव्याची राहणारी आहे. विक्रोळी ते भांडूप रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रसंग घडला असावा असे पूजाने सांगितले. तसेच ज्यांनी तिला या अपघातातून सुखरूप वाचविले त्यांचे तिने आभार मानले आहेत.

Video : 'त्या' वायरल व्हिडीओतील स्टंटबाज तरुणी अखेर सापडली
मुंबई - काल सोशल मीडियावर हृदयाचे ठोका चुकवणारा व्हिडीओ खूप वायरल झाला होता. या वायरल व्हिडीओत एक स्टंटबाज तरुणी पुरुषांच्या डब्यातून दरवाज्यात उभं राहून जीवघेणा प्रवास करत होती. हा व्हिडीओ वायरल झाल्यामुळ रेल्वे पोलिसांनी घटनेची चौकशी करायला सुरुवात केली. अखेर खूप प्रयत्नानंतर चौकशीदरम्यान पोलिसांना या मुलीचं नाव आणि पत्ता कळाला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तडख त्या तरुणीचे घर गाठलं तेव्हा तिच्या हाताला बँडेज बांधलेलं होतं आणि ती घरी आराम करत असल्याचं दिसलं. तिने हा प्रकार का केला असं पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मी फक्त हात बाहेर काढायला गेले होते त्यानंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही. पूजा भोसले असं या स्टंटबाज तरुणीचे नाव असून ती दिव्याची राहणारी आहे. विक्रोळी ते भांडूप रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रसंग घडला असावा असे पूजाने सांगितले. तसेच ज्यांनी तिला या अपघातातून सुखरूप वाचविले त्यांचे तिने आभार मानले आहेत. तसेच या तरुणीने दरवाज्यावर उभं राहुल हात झडकला तर काय झालं असं उर्मट उत्तर देत पूजाने जो व्हिडीओ शूट करत होता. त्याला शोधून धडा शिकवणार असल्याचे तिने धमकवणारे वक्तव्य केले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात पूजा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
VIDEO: दैव बलवत्तर म्हणून धावत्या लोकलमधून पडता पडता बचावली तरुणी