गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण; मंगळुरूतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 09:21 IST2023-06-02T09:20:24+5:302023-06-02T09:21:25+5:30

सोमेश्वर किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या या कपलना सहा व्यक्तींच्या टोळक्याने मारहाण केली आहे.

Students who came to the someshwar beach with their girlfriends were beaten up in Mangalore | गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण; मंगळुरूतील प्रकार

गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण; मंगळुरूतील प्रकार

कर्नाटकच्या मंगळुरु जिल्ह्यातील सोमेश्वर समुद्रकिनाऱ्यावर धक्कादायक घटना घडली आहे. किनाऱ्यावर प्रेयसींसोबच फिरायला आलेल्या तीन विद्यार्थ्यांना काही व्यक्तींनी मारहाण केली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांची नावे व इतर माहिती विचारण्यात आली, यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

पोलीस आयुक्त कुलदीप कुमार यांनी सांगितले की, जखमी झालेल्या तरुणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

सोमेश्वर किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या या कपलना सहा व्यक्तींच्या टोळक्याने मारहाण केली आहे. या टोळक्याचा संबंध काही संघटनांशी असण्याची शक्यता आहे, या संघटना प्रेमी युगुलांना वेळोवेळी समज देण्यासाठी अशी कृत्ये करत असतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Students who came to the someshwar beach with their girlfriends were beaten up in Mangalore