सांगली : ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न दिल्याने एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मल्लाळ येथे घडली. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १५) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत जत पोलिसांत नोंद झाली आहे.
आदर्श हराळे हा त्याच्या आजीकडे रेवनाळ ( ता. जत) येथे शिक्षण घेत होता. तो नववी पास होऊन दहावीत गेला. लॉकडाऊनमुळे सध्या तो मुळगावी मल्लाळ हराळे वस्ती येथे आई- वडीलाकडे आला होता. दहावीचा ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी त्याला मोबाईल हवा होता. त्याने मोबाईलसाठी आई वडिलांकडे तगादा लावला होता. त्याचे वडील शेतमजूर आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी त्याला थोडे दिवस थांब, पैसे आले की मोबाईल घेवून देतो असे समजावून सांगितले होते. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!
बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता
कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत
Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!
Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार
वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य