खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 16:14 IST2020-04-30T16:11:04+5:302020-04-30T16:14:26+5:30

या घटनेत पती आणि त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला, तर एका पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.

Strangled children and husband has jumped out of the building with his two wives pda | खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

ठळक मुद्दे घरगुती कलह आणि पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या वेदनादायक घटनेनंतर संपूर्ण इंदिरापुरममध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती

गाझियाबाद - गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पती आणि त्याच्या दोन पत्नी यांनी संशयास्पद परिस्थितीत अपार्टमेंटमधून उडी मारल्या. वैभव खंड अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून पती आणि त्याच्या दोन पत्नींनी उडी मारली. या घटनेत पती आणि त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला, तर एका पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. उडी मारण्यापूर्वी पती आणि दोन्ही पत्नींनीही आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबून हत्या केली. घरगुती कलह आणि पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

खळबळजनक! भाजपा ज्येष्ठ नेत्याच्या घरात गोळीबार, तिघांचे मृतदेह पडले होते रक्तबंबाळ अवस्थेत

 

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 


या वेदनादायक घटनेनंतर संपूर्ण इंदिरापुरममध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती, ज्यात कौटुंबिक वादात झोपलेले असताना पत्नी, पाच वर्षाचा मुलगा आणि दोन जुळ्या मुलींवर पतीने चाकूने वार करून ठार मारले होते. यानंतर तो फ्लॅट बंद करून पळून गेला. आरोपी आरोपी सुमित पत्नी अंशु बाला (३२), ५ वर्षाचा मुलगा परमेश आणि दोन जुळ्या मुलींसह राहत होता. दुपारी तीनच्या सुमारास सुमितने पत्नी आणि तिन्ही मुलांना चाकूने ठार मारले. यानंतर तो फ्लॅट बंद करून पळून गेला.

वैभवखंडमधील या हृदयद्रावक घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविले आहेत. मंगळवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. अपार्टमेंटच्या गार्डने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वैभवखंडच्या कृष्णा नीलम अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या तीन जणांनी उडी मारली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोन महिला आणि दोन पुरुष आढळून आला. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
 

Web Title: Strangled children and husband has jumped out of the building with his two wives pda