अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:41 IST2022-01-19T14:40:37+5:302022-01-19T14:41:04+5:30
Robbery Case :याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे.

अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले
कोल्हापूर - आपण सोनं, चांदी, पैसे आणि मौल्यवान चोरीच्या घटनांबद्दल ऐकलं असेलच, मात्र कोल्हापुरात काहीसा अजबच प्रकार घडला. काय म्हणावे या चोराला?. हा चोरटा महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करायचा. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ही अजब चोरीची घटना घडली. याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे.
हा चोर घरातील दागिने पळवणारा किंवा मौल्यवान साहित्य चोरणारा चोर नाही. तर अनेक चोर काही विचित्र गोष्टींची चोरी करतात, अशीच एक चोरीची घटना कोल्हापुरात समोर आली आहे. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ही घटना घडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. काही दिवसांपासून येथे महिलांची अंतर्वस्त्रे चोरीस जात होती. एका न्यायाधीशांच्या घराबाहेरील वाळत घातलेले कपडेही चोरीला गेले. नंतर या कपड्यांच्या चोरीबाबत पोलिसात तक्रार ही दाखल करण्यात आली. न्यायाधीशांनी पोलिसांत तक्रार केली पण चोर काही सापडत नव्हता. शेवटी न्यायाधीशांनीच सापळा रचून या चोरास रंगेहाथ पकडले. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे. गारगोटी परिसरातील महिलांची अंतर्वस्त्रे, अन्य कपडे चोरीस जात होते. न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून आठ दिवस पाळत ठेवली आणि त्याला पकडले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे