अजबच! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कर प्रकरणी कुत्र्याला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:25 PM2021-12-03T20:25:44+5:302021-12-03T20:26:13+5:30

Crime News : चौकशीदरम्यान, महिलेने वारंवार कुत्र्याला दोष दिला आणि दावा केला की, त्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत कुत्रा एकटाच होता.

Strange! Dog arrested for raping 9-year-old girl | अजबच! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कर प्रकरणी कुत्र्याला केली अटक

अजबच! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कर प्रकरणी कुत्र्याला केली अटक

Next

अमेरिकेत एका महिलेने घरातील पाळीव कुत्र्यावर तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्याला 'अटक' केली.

तपास पथकाला महिलेची थिअरी पटली नसली तरी आता मुलीच्या डीएनए नमुन्यावरून बलात्कार प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही महिला आपल्या दुसऱ्या पतीला वाचवण्यासाठी हा बनाव रचत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

महिलेने कुत्र्यावर आरोप केला

'द सन यूके'च्या वृत्तानुसार, मेक्सिकोतील एका महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर कुटुंबातील पाळीव कुत्र्याला दोषी ठरवले आणि त्याला तपास पथकाच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान, महिलेने वारंवार कुत्र्याला दोष दिला आणि दावा केला की, त्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत कुत्रा एकटाच होता.

तपास पथकाने पाळीव कुत्र्याला ताब्यात घेतले तर मुलीवर डॉक्टरांनी उपचार केले. परंतु अधिकाऱ्यांना महिलेच्या बतावणीवर संशय आला आणि त्यांनी मुलीच्या सावत्र वडिलांना अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. आपल्या दुसऱ्या पतीला वाचवण्यासाठी महिलेने ही बतावणी केल्याचं पोलिसांचे मत आहे. या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे ठरवण्यासाठी सध्या मुलीच्या डीएनए नमुन्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.त्याचबरोबर महिलेचीही चौकशी सुरू आहे. तिची मानसिक स्थितीही तपासली जात आहे. सध्या डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच प्रकरण समोर

Web Title: Strange! Dog arrested for raping 9-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app