बहिणीची छेड काढताना रोखले; भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 07:54 IST2023-08-30T07:54:19+5:302023-08-30T07:54:36+5:30

पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.  

Stopped teasing his sister; Brother's murder | बहिणीची छेड काढताना रोखले; भावाची हत्या

बहिणीची छेड काढताना रोखले; भावाची हत्या

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : चुलत बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. सत्यम शर्मा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी व आरोपी वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.  
पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.  
शाळा सुटल्यानंतर १५ वर्षांचा सत्यम चुलत बहिणीसह घरी परतत होता. वाटेत दुसऱ्या समुदायाच्या काही लोकांनी त्याच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न  केला. सत्यमने विरोध केल्यानंतर त्यांनी त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Stopped teasing his sister; Brother's murder