कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:05 IST2021-04-06T15:04:51+5:302021-04-06T15:05:45+5:30
Stone Pelting on deputy commissioner's Car : कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर उपायुक्तांच्या पथकाकडून नियमित कारवाई केली जात आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक
जळगाव : जिल्ह्यासह शहरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिका प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेले उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या वाहनावर मंगळवारी बागवान मोहल्ला परिसरात दगडफेक करण्यात आली. यात उपायुक्तांच्या वाहनाची काच फुटली आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर उपायुक्तांच्या पथकाकडून नियमित कारवाई केली जात आहे. मंगळवारी हे पथक सराफ बाजाराकडून जोशीपेठेकडे जात असताना बागवान गल्लीजवळ काही हाॅकर्स व नागरिक त्यांना विना मास्क दिसले. उपायुक्तांनी त्यांना विचारणा केली असता जमाव त्यांच्यावर चालून आला. यावेळी उपायुक्त वाहनात बसून निघून जात असताना जमावाने वाहनावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.